नाशिक-गुजरात रेल्वेमार्गासंदर्भात निवेदन

By Admin | Updated: August 9, 2014 00:49 IST2014-08-08T23:44:40+5:302014-08-09T00:49:50+5:30

नाशिक-गुजरात रेल्वेमार्गासंदर्भात निवेदन

Demand for Nashik-Gujrat railway line | नाशिक-गुजरात रेल्वेमार्गासंदर्भात निवेदन

नाशिक-गुजरात रेल्वेमार्गासंदर्भात निवेदन

दिंडोरी : नाशिक-गुजरात रेल्वेमार्गासाठी नुकत्याच झालेल्या सर्र्वेक्षणात बागायती क्षेत्रच प्रभावित होत असल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध केला असून, यासंदर्भात शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांना भेट घेऊन निवेदन सादर केले.
दिंडोरी परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे सचिव व्ही. के. गुप्ता यांची भेट घेऊन सदरच्या रेल्वेमार्गाने होणाऱ्या परिणामांची माहिती देत निवेदन दिले. सदरच्या निवेदनानुसार, नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील सिद्ध पिंपरी, ओझर, मोहाडी, कुर्नोली, खडक सुकेणा, कोराटे, दिंडोरी व दिंडोरी तालुक्यातील काही गावांच्या मध्यातील बागायती जमिनींमधून सदरचा रेल्वेमार्ग जाणार आहे. तसेच भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिष्टमंडळात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार धनराज महाले, चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, प्रवीण जाधव, सुरेश देशमुख, सुभाषराव देशमुख, उत्तमराव उगले आदिंसह शेतकऱ्यांचा समावेश होता. (वार्ताहर)

Web Title: Demand for Nashik-Gujrat railway line