नायगावी ग्रामीण रूग्णालय करण्याची मागणी

By Admin | Updated: June 29, 2014 00:50 IST2014-06-27T21:40:14+5:302014-06-29T00:50:25+5:30

नायगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.

Demand for Naigavi Rural Hospital | नायगावी ग्रामीण रूग्णालय करण्याची मागणी

नायगावी ग्रामीण रूग्णालय करण्याची मागणी

नायगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.
नायगाव खोऱ्यातील विविध गावांत गोडसे यांनी आभार दौरा केला. यावेळी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात बोलताना गोडसे यांनी ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण केंद्रातून जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच भाऊसाहेब लोहकरे यांच्या हस्ते गोडसे यांचा, तर उपसरपंच अर्जुन सानप यांच्या हस्ते पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सभापतींचेही भाषण झाले. प्रारंभी युवा सेनेचे विक्रम कातकाडे यांनी प्राथमिक रूग्णालयाबरोबरच विविध समस्या मांडल्या याप्रसंगी नीलेश कातकाडे, उद्धव सांगळे, मंगेश पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर जायगाव येथील हनुमान मंदिरात गोडसे यांचा संजय गिते यांच्या हस्ते, तर बाळासाहेब वाघ यांचा सत्कार उपसरपंच कैलास गिते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक उगले, गोदा युनियनचे संचालक चंद्र्रकांत गिते, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग गिते, खंडेराव गिते, सचिन दिघोळे, अर्जुन दिघोळे, विकास घुगे, विकास दिघोळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर देशवंडी, सुळेवाडी, बारापिंप्रीस आदि गावांना भेटी दिल्या. (वार्ताहर)

Web Title: Demand for Naigavi Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.