मागणी : मनसे शिक्षक सेनेचे निवेदन शिक्षकांना बीएलओची कामे देण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:20 IST2017-11-13T00:20:47+5:302017-11-13T00:20:53+5:30
शिक्षकांना बीएलओची कामे देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागणी : मनसे शिक्षक सेनेचे निवेदन शिक्षकांना बीएलओची कामे देण्यास विरोध
सातपूर : शिक्षकांना बीएलओची कामे देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिक्षकांना दैनंदिन अध्यापन, शैक्षणिक प्रगती, चाचणी, संकलित मूल्यमापन, परीक्षेचे पेपर तपासणीची कामे, आॅनलाइन गुणभरणे आदींसह विविध कामे करावी लागत आहेत. असे असताना शाळेतील सर्व शिक्षकांना बीएलओची कामे देण्यात आली आहेत.
शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करून शालेय कामकाज करण्यास पूर्णवेळ द्यावा, अशी मागणी प्रकाश सोनवणे, वासुदेव बधान, सुरेश खांडबहाले, यशवंत जाधव, शिवाजी शिंदे, राजेंद्र जाधव, सुवर्णा जोपळे, सुभाष पवार, वैभव आहिरे, आर. बेडसे, रघुनाथ हळदे, राजेंद्र आहिरे, हिरालाल परदेशी आदी शिक्षकांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा मिसाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.