शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांसाठी वनतळे तयार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 18:58 IST

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरावर कमी पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाआभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यात असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदि हिंस्त्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात येऊ लागले आहेत.

ठळक मुद्देजंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यात असलेले हिंस्त्र प्राणी शिवारात येऊ लागले आहेत.

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरावर कमी पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाआभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यात असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदि हिंस्त्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात येऊ लागले आहेत.खामखेडा गावच्या उत्तरेकडील भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभणगी पर्यत डोंगराच्या पर्वत रागा आहेत. या पर्वत रागांच्यामध्ये असलेल्या तिळवण किल्लाजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला गेल्या सात-आठ वर्षापर्यत भरपूर पाणी होते. या विहिरित खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या, त्यामुळे जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी विहीरित उतरून पाणी पित असे. परंतु या विहिरीचे कठाडे पडल्यामुळे विहीर दगड मातीने भरल्यामुळे या पर्वत रांगामध्ये बिबटयासह अन्य जंगली प्राण्याचे प्रभाव क्षेत्र आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे डोंगर,दऱ्यामघील पाण्याचे जलस्रोत आटल्याने डोंगरामध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात डोंगर पायथ्याजवळी मळयातील वस्तीवर रात्रीच्या वेळेस येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.वन विभागाने या वन्यप्राण्यांसाठी डोंगरामघ्ये कोणत्याही प्रकारची पाण्यासाठी वनतळे तयार केली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी परिसरात रात्री भक्ष्याच्या व पाण्याकरीता गावात फिरतात व सकाळी उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगराच्या कडेकपारीत विश्रांतीसाठी निघून जातात.मागबारी घाटातून राज्य महामार्ग आसल्याने या घाट परिसरात बर्याच दिवसापासून बिबट्याच्या मादीचे वास्तवे होते. तेव्हा अनेक वेळा रात्रीचे प्रवास करणाºया वाहन धारकाना या बिबट्याचे दर्शन होत होते. या घाटातून वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या दोन वर्षांपूवी मांगबारी घाटात रात्रीच्या वेळेस अन्न, पाण्याच्या शोधात फिरत आलेल्या बिबट्याच्या मादीला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या ठार झाला होता.आता तरी वनविभागाकडून या वन्य प्राण्यासाठी डोंगरात पाण्यासाठी वनतळे, किंवा पुरातन शिवकालीन बुटीच्या विहिरींच्या दुरस्ती केल्यास तेथे वन्य प्राण्याची पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होणार आहे. या बुटीच्या विहिरीला उन्हाळयात पाणी असते. तेव्हा वनविभागाने वन्य प्राण्यासाठी जंगला वनतळे व बुटीच्या विहिरिची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.