सौर पथदीप उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:11 IST2021-07-15T04:11:29+5:302021-07-15T04:11:29+5:30
सर्वतीर्थ टाकेद : तालुक्याच्या ग्रामपंचायत हद्दीत-वाड्यावस्त्यांमध्ये-डोंगराळ भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधव, शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून सौर ...

सौर पथदीप उपलब्ध करून देण्याची मागणी
सर्वतीर्थ टाकेद : तालुक्याच्या ग्रामपंचायत हद्दीत-वाड्यावस्त्यांमध्ये-डोंगराळ भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधव, शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून सौर पथदीप उपलब्ध करून देण्यात द्यावे, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी शिष्टमंडळासह खासदार हेमंत गोडसे यांना दिले.
सर्वच वाड्या-वस्त्यांमध्ये, झापवस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी सौर पथदीपांच्या उजेडामुळे वन्य हिंस्र प्राणी झापवस्तीवर येणार नाहीत व यामुळे आदिवासी बांधवांचे प्रकाशामुळे संरक्षण होईल. इगतपुरी तालुक्यात गेल्या एक-दीड वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास सहा निष्पाप जीवांचा मृत्यू झाला आहे. यात बिबट्याच्या हल्ल्यात इगतपुरीच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर येथील एक, अधरवड येथील एक, खेड-काननवाडी येथील एक अशा तीन लहान निष्पाप मुलींचा मृत्यू झाला आहे तर टाकेद-खेड-अडसरे-भरविर, घोडेवाडी, वासाळी आदी गावांसह परिसरात अनेक ठिकाणी विविध वाड्या-वस्त्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात अनेक आदिवासी बांधव - शेतकऱ्यांच्या पाळीव शेळ्या, गुरे, वासरे मृत्युमुखी पडलेली आहेत. यासोबत अनेकदा झाप वस्तीवर रहिवास असलेल्या शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री, दिवसाढवळ्या बिबट्याचे शेतात, रस्त्यात दर्शन होत आहे. याप्रसंगी आबाजी बारे, रामदास जगताप, राजेंद्र बांबळे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
----------------------------
फोटो : विलास आडके यांना निवेदन देताना राम शिंदे, आबाजी बारे, रामदास जगताप, राजेंद्र बांबळे आदी. (१४ टाकेद)
140721\14nsk_5_14072021_13.jpg
१४ टाकेद