शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

कला, क्रीडा निर्देशकांना नेमणूक पत्र देण्याची मागणी

By admin | Updated: June 20, 2014 01:20 IST

देवळा : राज्यातील १८ हजार ६४५ अर्धवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव निर्देशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी भरावीत.

देवळा : राज्यातील १८ हजार ६४५ अर्धवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव निर्देशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र (सन २०१४-२०१५) सुरू होण्यापूर्वी भरावीत, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. यानंतर पुढील शैक्षणिक सत्र सुरू होऊन आठवडा होत आला; परंतु अद्यापही कला, क्रीडा व कार्यानुभव निर्देशकांना नेमणुकीचे पत्र मिळालेले नसल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून, त्वरित नियुक्तिपत्र देण्याची मागणी केली आहे.शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीपर्यंतची ५८ संख्या १०० पेक्षा अधिक आहे. अशा शाळांवर कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक केली. नेमणूक त्या शाळेतील शालेय शिक्षण समितीमार्फत करण्यात आली. शासन परिपत्रकाप्रमाणे नेमणुकांत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले. नियुक्ती अंशकालीन व तासिका तत्त्वावर करण्यात आली होती. याप्रमाणे राज्यात १८ हजार ६४५ निर्देशकांची नेमणूक करण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपात असलेली नेमणूक नंतर खंडित करण्यात आली. याबाबत या अंशकालीन निर्देशकांनी याचिका दाखल केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या निर्देशकांची नियुक्ती करण्यात यावी, असा निर्णय दिला. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आठवडा होत आला; परंतु ह्या निर्देशकांच्या नियुक्तीबाबत जिल्हा परिषदेत कोणतीही हालचाल दिसत नाही.नाशिक जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक निर्देशक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. देवळा तालुक्यात मटाणे, वाजगाव, डोंगरगाव, महालपाटणे, चिंचवे, तिसगाव, जिल्हा परिषद विद्यानिकेतन अशा सात शाळांवर कला, क्रीडा व कार्यानुभव विषयांसाठी २१ निर्देशकांची नेमणूक करण्यात आली होती. न्यायालयाच्या निकालानंतर या निर्देशकांना दिलासा मिळाला होता. परंतु अद्यापपर्यंत नियुक्तिपत्र न मिळाल्याने हे निर्देशक चिंतित आहे.(वार्ताहर)असून, नियुक्तिपत्र त्वरित देण्याची मागणी त्यांनी केली आहे.