कला, क्रीडा निर्देशकांना नेमणूक पत्र देण्याची मागणी

By Admin | Updated: June 20, 2014 01:20 IST2014-06-20T00:33:36+5:302014-06-20T01:20:22+5:30

देवळा : राज्यातील १८ हजार ६४५ अर्धवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव निर्देशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी भरावीत.

Demand for letter of appointment to Art, Sports Directors | कला, क्रीडा निर्देशकांना नेमणूक पत्र देण्याची मागणी

कला, क्रीडा निर्देशकांना नेमणूक पत्र देण्याची मागणी

देवळा : राज्यातील १८ हजार ६४५ अर्धवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव निर्देशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र (सन २०१४-२०१५) सुरू होण्यापूर्वी भरावीत, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. यानंतर पुढील शैक्षणिक सत्र सुरू होऊन आठवडा होत आला; परंतु अद्यापही कला, क्रीडा व कार्यानुभव निर्देशकांना नेमणुकीचे पत्र मिळालेले नसल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून, त्वरित नियुक्तिपत्र देण्याची मागणी केली आहे.
शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीपर्यंतची ५८ संख्या १०० पेक्षा अधिक आहे. अशा शाळांवर कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक केली. नेमणूक त्या शाळेतील शालेय शिक्षण समितीमार्फत करण्यात आली. शासन परिपत्रकाप्रमाणे नेमणुकांत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले. नियुक्ती अंशकालीन व तासिका तत्त्वावर करण्यात आली होती. याप्रमाणे राज्यात १८ हजार ६४५ निर्देशकांची नेमणूक करण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपात असलेली नेमणूक नंतर खंडित करण्यात आली. याबाबत या अंशकालीन निर्देशकांनी याचिका दाखल केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या निर्देशकांची नियुक्ती करण्यात यावी, असा निर्णय दिला. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आठवडा होत आला; परंतु ह्या निर्देशकांच्या नियुक्तीबाबत जिल्हा परिषदेत कोणतीही हालचाल दिसत नाही.
नाशिक जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक निर्देशक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. देवळा तालुक्यात मटाणे, वाजगाव, डोंगरगाव, महालपाटणे, चिंचवे, तिसगाव, जिल्हा परिषद विद्यानिकेतन अशा सात शाळांवर कला, क्रीडा व कार्यानुभव विषयांसाठी २१ निर्देशकांची नेमणूक करण्यात आली होती. न्यायालयाच्या निकालानंतर या निर्देशकांना दिलासा मिळाला होता. परंतु अद्यापपर्यंत नियुक्तिपत्र न मिळाल्याने हे निर्देशक चिंतित आहे.(वार्ताहर)
असून, नियुक्तिपत्र त्वरित देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Demand for letter of appointment to Art, Sports Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.