सिद्धपिंप्रीमार्गे जादा बस सोडण्याची मागणी
By Admin | Updated: September 27, 2016 22:58 IST2016-09-27T22:58:06+5:302016-09-27T22:58:40+5:30
ओझर, दिंडोरी बससेवा सुरू

सिद्धपिंप्रीमार्गे जादा बस सोडण्याची मागणी
सिद्धपिंप्री : सिन्नर ते दिंडोरी अशी सिद्धपिंप्रीमार्गे बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. परंतु नवरात्रोत्सवात जादा बस सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिन्नर ते सिद्धपिंप्रीमार्गे ओझर, दिंडोरी बससेवा अखेर सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर ते सिद्धपिंप्रीमार्गे ओझर, दिंडोरी बससेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने विद्यार्थी त्याचप्रमाणे ग्रामस्थ करीत होते.
या बससेवेमुळे सतरा गावांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सिन्नर येथून सकाळी ८ वाजता बस सुटेल. सिद्धपिंप्रीमध्ये ८.४५ वाजता ओझरमार्गे दिंडोरी येथे बस १० वाजता पोहोचेल. पुन्हा दिंडोरी येथून १0 निघून पिंप्रीमध्ये १०.४५ वाजता येईल. तसेच सिन्नर येथे १२ वाजता पोहोचेल. ही बस सिन्नरहून सुटल्यानंतर शिंंदे, चांदगिरी, जाखोरी, कोटमगाव, सामनगाव, एकलहरे, काळवी, गंगापाडळी, लाखलगाव, सिद्धपिंप्री, दहावा मैल, ओझर, जानोरी, मोहाडी, कुऱ्हाटे, पालखेड आदि गावांसह आजूबाजूच्या परिसरातील ३० ते ४० गावांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तसेच सदर बससेवेमुळे नवरात्रोत्सवात महामंडळाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुढे वणी येथे सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी सिन्नर, नाशिक, निफाड, दिंडोरी आदि तालुक्यांतील प्रवासी मोठ्या प्रमाणात या बसचा फायदा घेणार आहेत. दरम्यान, नवरात्रोत्सवात जादा बसेस सोडण्याची मागणी सिद्धपिंप्रीतील ग्रामस्थ करीत आहेत. तसेच या बससेवेमुळे चार तालुक्यांतील दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. तसेच या बससेवेमुळे नवरात्रोत्सवात वणी गडावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
याप्रसंगी सिद्धपिंप्री उपसरपंच सुका पवार, अंबादास ढिकले, शशिकांत ढिकले, नंदकुमार साळुंके, धनंजय लोखंडे, आनंदा ढिकले, तुकाराम ढिकले, पुंडलिक झुर्डे, बाळासाहेब शिरसाठ, कचरू वराडे, काशीनाथ दादा ढिकले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)