जलालपूर-महादेवपूर रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:12 IST2020-01-10T23:07:04+5:302020-01-11T01:12:56+5:30

त्र्यंबकेश्वर : गंगापूर गाव ते गिरणारे या राज्य महामार्गाला जोडणारा जलालपूर ते महादेवपूर रस्त्याचे काम सुरू असल्याने मोऱ्या बांधकामासाठी ...

Demand for Jalalpur-Mahadevpur road repair | जलालपूर-महादेवपूर रस्ता दुरुस्तीची मागणी

जलालपूर-महादेवपूर रस्ता दुरुस्तीची मागणी

त्र्यंबकेश्वर : गंगापूर गाव ते गिरणारे या राज्य महामार्गाला जोडणारा जलालपूर ते महादेवपूर रस्त्याचे काम सुरू असल्याने मोऱ्या बांधकामासाठी रस्ते खोदून ठेवल्याने पायी चालणारे व दुचाकी चालकांसाठी वळण रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जलालपूर ते महादेवपूर या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. तत्पूर्वी या रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी मोºया (छोटे पूल) बांधण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी एकूण पाच मोऱ्यांचे बांधकाम करण्यासाठी पाच ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. ठिकठिकाणी डबर-खडी आदी आणून टाकल्याने जाणारे-येणारे पादचारी, शाळेतील विद्यार्थी कामावर जाणारे यांचे अतोनात हाल होत आहेत. रात्री-बेरात्री येणाºया-जाणाºयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे छोटा का होईना वळण रस्ता करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Demand for Jalalpur-Mahadevpur road repair