सराफाच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 15:14 IST2020-02-28T15:13:05+5:302020-02-28T15:14:08+5:30
पिंपळगाव बसवंत : तेलंगणा पोलिसांच्या संशयास्पद मयत झालेले सराफ विजय बिरारी यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी पिंपळगाव बसवंत सुवर्णकार सराफ असोसिएशनतर्फे पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे व उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सराफाच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी
ठळक मुद्देदि. २५ फेब्रुवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी खोट्या गुन्हात खंडणीसाठी पंचवटीतील सराफ यांना अटक केली. स्थानिक पोलीस ठाण्यात याबद्दल कोणतीही माहिती न देता त्यांच्यावर परस्पर कारवाई केली.
पोलीस ठाण्यात न नेता विजय बिरारी यांना विश्रामगृहात नेऊन त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला, त्यानंतर त्यांचा विश्रामगृहाच्या चौथा मजल्यावरून पडून बिरारी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब दुसाने, कांता वडनेरे, संतोष सुकेणकर, चेतन जंगम, वैभव खरोटे, अमित थोरात, किरण बाविस्कर, नंदकुमार दुसाने, विलास बिरारी, महावीर चोपडा, मनोज मुथा, सागर राठी, भगवान राठी, भूषण पारख, ज्ञानेश्वर वडनेरे, संदीप थोरात, सागर दुसाने आदी उपस्थित होते.