पतसंस्था अपहार प्रकरणी चौकशीची मागणी
By Admin | Updated: August 6, 2016 00:35 IST2016-08-06T00:34:52+5:302016-08-06T00:35:02+5:30
पतसंस्था अपहार प्रकरणी चौकशीची मागणी

पतसंस्था अपहार प्रकरणी चौकशीची मागणी
दहिवड : देवळा येथील रामचंद्र विनायक कोठावदे पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी जिल्हा न्यायालयाने संशयित आरोपींचा जामीन अर्ज नाकारल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी ठेवीदारांच्या वतीने करण्यात आली आहे.
देवळा येथील संस्थेचे सभासद तथा ठेवीदार डॉ . राजेंद्र ब्राम्हणकार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे . पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळासह ६२ जणांवर देवळा पोलिसात दि .२९ जून रोजी ४ कोटी सात लाख १२ हजार ७६ रु पयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन नासिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याचा तपास देण्यात आला असून संबंधितांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची ठेवीदारांची अपेक्षा होती. मात्र तपासाबाबत ठेवीदारात साशंकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.