बिटकोतील भोजन गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST2021-06-02T04:12:59+5:302021-06-02T04:12:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिकरोड विभागाची बैठक ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, नाशिकरोड अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार, माजी नगरसेवक ...

Demand for Inquiry into Bitcoin Food Malpractice | बिटकोतील भोजन गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी

बिटकोतील भोजन गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिकरोड विभागाची बैठक ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, नाशिकरोड अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार, माजी नगरसेवक शैलेश ढगे, योगेश निसाळ, राहुल तुपे, सुरेखा निमसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी झालेल्या चर्चेत कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या भोजन घोटाळा व महापालिका गार्डन मेंटेन्स बिल घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली. कोरोना काळातील नागरिकांच्या समस्या, नाशिक महापालिका निवडणूक, कोरोना रुग्णांच्या भोजन वाटप ठेक्यातील व बिलातील ठेकेदाराचा घोटाळा, गार्डन विभागातील मेंटेन्स बिल ठेक्यातील घोटाळा याबाबत चर्चा झाली. पक्षाचे नगरसेवक आणि पालकमंत्र्यांनी या प्रकाराची चौकशी करावी यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकरोड उपाध्यक्ष संजय वरखेडे, शहर संघटकपदी आदित्य धिवर व संदीप बोढारे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. बैठकीला योगेश कपिले, गणेश बोराडे, सोनू यादव, रमेश पगार, बाळासाहेब जाधव, विवेक जाधव, शेखर सरोदे, अर्चना जाधव, प्रशांत वाघ, संजय पगारे व इतर पदाधिकारी हजर होते.

Web Title: Demand for Inquiry into Bitcoin Food Malpractice