नॉन क्रीमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी
By Admin | Updated: July 17, 2014 00:31 IST2014-07-16T23:07:59+5:302014-07-17T00:31:57+5:30
नॉन क्रीमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी

नॉन क्रीमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी
निफाड : राज्यातील विविध अभियांत्रिकी वैद्यकीय व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर मागास, विशेष मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातीतील उत्पन्न गटाकरिता नॉन क्रीमिलेअरची असलेली उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांऐवजी सहा लाख करावी या मागणीचे निवेदन पालकांच्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवणीस आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना निफाड येथे देण्यात आले.
केंद्र शासनाच्या दि. २७ मे २०१३ रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे राज्य शासनाने दि. २४ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार इतर मागासवर्गीयांसाठी नॉन क्रीमिलेअरची उत्पन्न मर्यादा सहा लाख केली. या निर्णयानुसार राज्यातील सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संबंधित न्याय विभागाने दि. ३१ आॅगस्ट २०१३ रोजी एका परिपत्रकाद्वारे शिष्यवृत्तीची मर्यादा चार लाख पन्नास हजार रुपये हीच उत्पन्न मर्यादा ग्राह्य धरली जाईल, असे मार्गदर्शक निर्देश पाठवून संभ्रम निर्माण केला. या परिपत्रकामुळे संबंधित महाविद्यालयांनी प्रवेश घेतलेल्या व उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांवर असलेल्या विद्यार्थ्यांकडून मागील २०१३ ला फी वसूल केली. नॉन क्रीमिलेअरची मर्यादा सहा लाख करावी यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करत पालकांची ही मागणी पूर्ण करून दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते. (वार्ताहर)