भावली येथील कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:21 IST2021-03-22T23:31:47+5:302021-03-23T01:21:34+5:30
घोटी : गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली येथील ...

भावली येथील कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याची मागणी
घोटी : गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली येथील बंद केलेले कोविड सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना सोमवारी (दि.२२) निवेदन देण्यात आले. जिल्हाभर कोरोनाचे वाढते प्रमाण गंभीर असून इगतपुरी तालुक्यातही त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे भावली येथील बंद केलेले एकलव्य कोविड सेंटर तातडीने पुन्हा सुरू करावे व त्या ठिकाणी सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. मराडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कासुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर कोविड सेंटर लवकरच चालू करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. या प्रसंगी संजय सहाणे, आत्माराम मते, रामदास आडोळे, कैलास भगत, कृष्णा भगत, हरिश्चंद्र चव्हाण, गणेश मुसळे, विनोद चव्हाण, विशाल पावसे, रावसाहेब सहाणे, सखाहारी जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
भावली येथील कोविड सेंटर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देताना मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, संजय सहाणे, आत्माराम मते, रामदास आडोळे, कैलास भगत आदी.