निवडणूककामी नियुक्त राखीव कर्मचाऱ्यांची मानधनाची मागणी
By Admin | Updated: April 5, 2017 00:23 IST2017-04-05T00:22:31+5:302017-04-05T00:23:00+5:30
येवला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत राखीव असणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. या कर्मचाऱ्यांनी मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे.

निवडणूककामी नियुक्त राखीव कर्मचाऱ्यांची मानधनाची मागणी
येवला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत राखीव असणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. या कर्मचाऱ्यांनी मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे.
गेल्या महिन्यापूर्वी येवला तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खासगी संस्थांतील व जिल्हा परिषदेमधील एकूण ११०४ कर्मचाऱ्यांची निवडणूककामी नियुक्ती केली होती. यासाठी कार्यालयाने निवडणूक कार्यात १००२ व राखीव म्हणून १०२ असे ११०४ कर्मचारी नियुक्त केले होते. नियमित कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज आटोपल्यानंतर ताबडतोब मानधन देण्यात आले. परंतु काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते. याची कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. सदर कर्मचारी निवडणूक कामातील नियोजनाप्रमाणे मार्गदर्शन घेतले.
प्रत्येक बैठकीसाठी उपस्थित होते. तशी नोंदही उपस्थिती पत्रकात आहे. परंतु या कर्मचाऱ्यांचे निवडणूक आदेश तहसील कार्यालयाने २१ रोजी जमा केले व ते आदेश रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु ऐनवेळी राखीव जाहीर करण्यात आलेले कर्मचारी दिनांक ३१ जानेवारी, व ९ व २० फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रशिक्षण व बैठकीसाठी कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित होते. परंतु सदर कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामाचे मानधन तहसील कार्यालयाने महिन्यानंतरही अदा केले नाही. याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे या तत्कालीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सदर कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. इतर तालुक्यांमध्ये सर्व राखीव कर्मचाऱ्यांचे मानधन तत्काळ अदा केले गेले, मात्र येवला तालुक्यात उशीर का, असा सवाल कर्मचारी करीत आहेत. (वार्ताहर)