श्री सहस्त्रार्जुन महाराजांचे नाव चौकाला देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST2021-02-09T04:16:52+5:302021-02-09T04:16:52+5:30

सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय ते बालेश्वरी मंदिर, सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय ते डीजी रोड व सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय ते खंडेराव मंदिर ...

Demand to give the name of Shri Sahasrarjuna Maharaj to Chowk | श्री सहस्त्रार्जुन महाराजांचे नाव चौकाला देण्याची मागणी

श्री सहस्त्रार्जुन महाराजांचे नाव चौकाला देण्याची मागणी

सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय ते बालेश्वरी मंदिर, सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय ते डीजी रोड व सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय ते खंडेराव मंदिर हे तिघे रस्ते सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय येथील चौकामध्ये मिळतात. सदर चौकाला आतापर्यंत कोणतेही नाव नाही. परिसरात मोठ्या संख्येने सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज राहतो व चौक सहस्त्रार्जुन मंगलकार्यालयाला खेटून आहे. त्यामुळे या चौकाचे श्री सहस्त्रार्जुन महाराज चौक असे नामकरण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी नगरसेवक सस्कर यांनी, याबाबत पालिका सभेत सूचना मांडून लवकरात लवकर ठराव मंजूर केला जाईल, असे सांगितले. भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. याप्रसंगी बाबू खानापुरे, हेमंत सांबर, ललित वखारे, वैष्णव पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Demand to give the name of Shri Sahasrarjuna Maharaj to Chowk