अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By Admin | Updated: August 31, 2016 22:25 IST2016-08-31T22:23:41+5:302016-08-31T22:25:06+5:30

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

The demand for filing of criminal cases against the officials | अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

सिन्नर : पांगरी येथील घरकूल व विहिर घोटाळ्यातील लाभार्थी व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
घरकुल व विहिर योजनेत गैरकारभार करणाऱ्या अधिकारी व लाभार्थी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असल्याचा दावा बैरागी यांनी केला आहे. मात्र पंचायत समितीच्या प्रशसनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप बैरागी यांनी केला आहे. जोपर्यंत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जात नाही तोपर्यंत कार्यालयातील कोणतेही कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा बैरागी यांनी निवेदनात दिला आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर बसून आंदोलन करणार असल्याचे बैरागी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: The demand for filing of criminal cases against the officials