गुन्हा दाखल करण्याची मागणी

By Admin | Updated: July 27, 2014 01:49 IST2014-07-27T01:48:52+5:302014-07-27T01:49:17+5:30

आयुष्यभर जागर करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येचा

The demand for filing the crime | गुन्हा दाखल करण्याची मागणी

गुन्हा दाखल करण्याची मागणी

पोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी : विवेक आणि विज्ञाननिष्ठेचा आयुष्यभर जागर करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येचा तपास लावण्यासाठी प्लॅँचेटसारख्या अनिष्ट प्रथेचा वापर करणारे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या शहर शाखेच्या वतीने सरकारवाडा पोलीस ठाण्याकडे करण्यात आली. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास असमर्थता दर्शविल्याचे ‘आप’चे संयोजक जितेंद्र भावे यांनी सांगितले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्त्येचा तपास अकरा महिने लोटूनही अद्याप लागलेला नाही. याउलट माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मांत्रिक ठाकूरच्या साहाय्याने दाभोलकरांच्या आत्म्याशीच संवाद साधण्याचा प्रयत्न करत दाभोलकरांच्या विचारांना पराभूत केले. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर झालेले असताना कायद्याचे रक्षकांनीच जादूटोण्याचा आधार घेत कायद्याला तिलांजली दिली आहे. अकार्यक्षम पोलिसांचे हे पितळ आपचे नेते व ज्येष्ठ पत्रकार आशिष खेताना यांनी स्टिंग आॅपरेशनद्वारे उघडे पाडले. तरीही पुरोगामी महाराष्ट्राच्या पोलिसांनी पोळ यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. चित्रफितीचा पुरावा ग्राह्य धरून पोलिसांनी पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी महानगर समन्वयक जितेंद्र भावे, जगनीर सिंग, सचिन शिनगारे, प्रियदर्शन भारतीय, अक्षय अहिरे, तेजस सोनार, विकास पाटील, सुमित शर्मा, संजय तांबे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The demand for filing the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.