मुंगसरा येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:27 IST2020-12-03T04:27:21+5:302020-12-03T04:27:21+5:30
दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ग्रामीण भागात रुग्ण आढळत आहेत. गावात कुठल्याही प्रतिबंधित व्यवस्था नसल्याने जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे गावाचे आरोग्य ...

मुंगसरा येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ग्रामीण भागात रुग्ण आढळत आहेत. गावात कुठल्याही प्रतिबंधित व्यवस्था नसल्याने जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे गावाचे आरोग्य धोक्यात आहे. मुंगसरा गावातील तलाठी यांनी कामकाजात हलगर्जीपणा केल्याने ही बाब गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. तहसीलदारांनी तातडीने संबंधित तलाठीवर शिस्तभंगाची व आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी केली नसल्याबाबतची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामविकास संवाद मंचचे संयोजक ॲड. प्रभाकर वायचळे यांनी तहसीलदार दौंड यांच्याकडे केली आहे.
----------------------------------सस------------------------