शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी
By Admin | Updated: November 8, 2015 23:06 IST2015-11-08T23:02:24+5:302015-11-08T23:06:52+5:30
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी
सिन्नर : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी व मजुरांना कर्जमाफी मिळावी, महागाई कमी व्हावी, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
दिवाळीपूर्वीच जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावेत अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर माजी तालुकाध्यक्ष शरद शिंदे, एकनाथ दिघे, जालिंदर लोंढे, कैलास दातीर, चंद्रकांत डावरे, कैलास सहाणे, भगवान मिस्तरी, राहुल जाधव, एकनाथ माळी, अमोल जाधव, विठ्ठल जाधव, शरद घुगे, कलाबाई पवार, वंदना जाधव, ताई माळी, रेणुका माळी, मीरा माळी, मनुबाई पवार, लीलाबाई पवार, अर्जुन घोरपडे आदिंसह कार्यकर्त्यांची नावे आहेत.
(वार्ताहर)