दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST2020-12-30T04:18:26+5:302020-12-30T04:18:26+5:30

दिंडोरी : दिव्यांग शिक्षक, आजारी शिक्षक, ५५ वर्षांवरील शिक्षक, गरोदर व स्तनदा माता असलेल्या शिक्षिका यांना ग्रामपंचायत निवडणूक कामातून ...

Demand for exclusion of the disabled from election work | दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी

दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी

दिंडोरी : दिव्यांग शिक्षक, आजारी शिक्षक, ५५ वर्षांवरील शिक्षक, गरोदर व स्तनदा माता असलेल्या शिक्षिका यांना ग्रामपंचायत निवडणूक कामातून वगळण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ दिंडोरी तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार पंकज पवार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ज्या शिक्षकांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सहायक म्हणून नेमणुका दिल्या आहेत, त्यांना पुन्हा मतदान अधिकारी म्हणून आदेश देण्यात येऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे. शिक्षक संघाच्या निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे तहसीलदारांनी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना सांगितले. शिक्षक संघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन वडजे, सरचिटणीस योगेश बच्छाव, कोषाध्यक्ष मधुकर आहेर, कार्यालयीन चिटणीस बाळासाहेब बर्डे, डीटीपीटी पतसंस्था व्हा. चेअरमन विलास पेलमहाले, तालुका उपाध्यक्ष संदीप झुरुडे, संपर्क प्रमुख कल्याण कुडके, तालुका उपाध्यक्ष सचिन वसमतकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

Web Title: Demand for exclusion of the disabled from election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.