अकरावीच्या जागा वाढवून देण्याची मागणी
By Admin | Updated: July 23, 2016 22:18 IST2016-07-23T22:18:48+5:302016-07-23T22:18:48+5:30
अकरावीच्या जागा वाढवून देण्याची मागणी

अकरावीच्या जागा वाढवून देण्याची मागणी
नाशिकरोड : शहरातील महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या वर्गासाठी सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून बहुतांश विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश न मिळाल्याने महाविद्यालयांना २० टक्के जागा वाढवुन द्याव्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या वर्गातील प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता आपल्या विभागाकडून १० टक्के जागा वाढवुन दिलेली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित असल्याने शहरातील काही महत्त्वाच्या महाविद्यालयांना आणखीन २० टक्के जागा वाढवुन देण्यात याव्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर उमेश भोई, संदीप भवर, अतुल धोंगडे, शाम गोहाड, संदेश जगताप, नितीन धानापुणे, बाजीराव मते, सागर दाणी, गणेश घनदाट, अक्षय भोसले, अमोल जमधडे आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)