ठिबक सिंचनाच्या थकीत अनुदानाची मागणी
By Admin | Updated: June 27, 2014 00:14 IST2014-06-26T20:58:07+5:302014-06-27T00:14:03+5:30
ठिबक सिंचनाच्या थकीत अनुदानाची मागणी

ठिबक सिंचनाच्या थकीत अनुदानाची मागणी
दरेगाव : राज्य सरकार एकीकडे ठिबक सिंचनाचा प्रचार करीत असतानाच २०११-१२च्या वर्षातील ठिबक सिंचनाचे अनुदान मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही. अल्पभूधारक शेतकरी ६० व मोठ्या शेतकऱ्यांना ५० टक्के प्रमाणात ठिबक सिंचन अनुदान देण्यात येते. चांदवड तालुका हा दुष्काळी असून, पाणी कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी फळपिकांबरोबर अन्य पिकांनाही सूक्ष्म सिंचन केले. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात संच बसविले. चांदवड तालुक्यात २०११-१२ या वर्षात ३९०.९१ क्षेत्रावर ६६७ शेतकऱ्यांचे ९९ लाख २८०९ रूपये इतके अनुदान रक्कम अद्यापही प्रलंबित आहे. सदरचे थकीत अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळावे, अशी मागणी शेतकरी
करीत आहेत.