दाभाडी येथे दारूबंदी करण्याची मागणी

By Admin | Updated: January 9, 2015 00:38 IST2015-01-09T00:12:39+5:302015-01-09T00:38:08+5:30

दाभाडी येथे दारूबंदी करण्याची मागणी

Demand for a drink in Dabhadi | दाभाडी येथे दारूबंदी करण्याची मागणी

दाभाडी येथे दारूबंदी करण्याची मागणी


गिसाका : दाभाडी गावात पूर्णत: दारूबंदी करावी, अशी मागणी ग्रामस्थ महिलांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दाभाडी गाव व परिसरात सर्रास दारूविक्री होत आहे. त्यामुळे येथील अनेक घरांमध्ये रोजची भांडणे होतात. अनेक तरुणांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. महिलांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर गावात दारूबंदी करावी, अशी मागणी संतप्त महिलांनी सरपंच नंदू पवार, उपसरपंच नीलेश शिंपी व ग्रामविकास अधिकारी दिलीप बनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गावात दारूबंदी होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन संबंधितांनी दिले. यावेळी श्रीमती नंदाबाई नवरे, अनुसया मानकर, अश्विनी मुळेकर, तुळसा साळवे, संगीता महाजन, मीरा पाटील, उषा गायकवाड, जयश्री कापसे आदि महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)

Web Title: Demand for a drink in Dabhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.