रेल्वे आरक्षण केंद्रात बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 23:10 IST2016-06-06T23:02:20+5:302016-06-06T23:10:20+5:30

भिकारी, फिरस्त्यांचा उपद्रव

Demand Draft in Railway Reservation Center | रेल्वे आरक्षण केंद्रात बंदोबस्ताची मागणी

रेल्वे आरक्षण केंद्रात बंदोबस्ताची मागणी

 नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील तिकीट आरक्षण केंद्रात भिकारी, फिरस्ते वास्तव्यास राहत असल्याने पोलीस बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे अधीक्षक एम. बी. सक्सेना यांना रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नितीन चिडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे आरक्षण केंद्रात व बाहेर मोठ्या प्रमाणात भिकारी, फिरस्ते त्यांची लहान मुले वास्तव्यास असतात. आरक्षण कार्यालयात येणाऱ्या प्रवाशांना व विशेष करून महिला प्रवाशांकडे भीक मागताना लहान मुले त्यांचे कपडे खेचतात. भिकारी व फिरस्ते यांच्यात आपापसांत वादविवाद झाल्यानंतर शिवीगाळ, मारामाऱ्या करतात. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासन व पोलिसांनी यात त्वरित लक्ष घालून आरक्षण केंद्रात वास्तव्यास असलेल्या भिकारी व फिरस्त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अनिल अहेर, संजय पाटील, शेखर पवार, रमेश मोटे, गणेश शिंदे, विलास शिंदे, राकेश जोशीे आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Demand Draft in Railway Reservation Center