शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:34 PM2021-06-02T20:34:50+5:302021-06-03T00:11:01+5:30

येवला : कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलेल्या विध्यार्थीना शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. शहर, ग्रामीण, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर तथा डोंगराळ-दुर्गम भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित शालेय अभ्यासक्रमाची क्रमिक पाठ्यपुस्तके वितरित करावी, अशी मागणी अध्यापकभारतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for distribution of school textbooks | शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्याची मागणी

शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देअध्यापकभारतीचे शालेय शिक्षण विभागाला निवेदन

येवला : कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलेल्या विध्यार्थीना शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. शहर, ग्रामीण, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर तथा डोंगराळ-दुर्गम भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित शालेय अभ्यासक्रमाची क्रमिक पाठ्यपुस्तके वितरित करावी, अशी मागणी अध्यापकभारतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना सदर निवेदन पाठवण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २१-२२ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणे निश्चित होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षातही ऑनलाईन वर्गाचा फज्जा उडाला होता. या वर्षीही आकाशवाणी व दूरदर्शनसह अन्य खाजगी वाहिन्यांनाही शालेय अभ्यासक्रम त्या त्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक दूरचित्र वाहिन्या यांना प्रसारित करण्याचे बंधन करण्यात यावे, ज्या योगे दैनंदिन अभ्यासक्रम हा वृत्तपत्रे, आकाशवाणी व दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घेण्यात यावा, सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमाचा अवधी पाच ते सहा तास करण्यात यावा, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शरद शेजवळ, संतोष बुरंगे, प्रा. विनोद पानसरे, अमीन शेख, प्रा. कामिनी केवट, शैलेंद्र वाघ, सुभाष वाघेरे, मिलिंद गुंजाळ, प्रा. मिलिंद गांगुर्डे, नीलिमा गाडे, वनिता सरोदे, भारती बागुल, अतुल डांगळे, दीपक शिंदे, सागर पगारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Demand for distribution of school textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.