नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची मागणी

By Admin | Updated: July 26, 2016 23:52 IST2016-07-26T23:52:41+5:302016-07-26T23:52:41+5:30

नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची मागणी

Demand for discounted industries in Nashik Industries | नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची मागणी

नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची मागणी

नाशिक : नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभा अधिवेशानामध्ये पुरवणी मागणी करताना केली. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात विचार विनिमय करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
विदर्भ व मराठवाड्यास उद्योगांसाठी वीज दरात सवलत देण्यात आलेली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी १७५ कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु ती अत्यल्प असून, त्यात अजून ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीची गरज आहे. नाशिकमधील स्टील इंडस्ट्रीजमध्ये ९ ते १० मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे माध्यमातून ४५० कोटी रु पये प्रतिवर्ष वीज बिल भरले जाते. त्यामुळे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचार विनिमय करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for discounted industries in Nashik Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.