डिप्लोमा इंजिनिअरिंग शुल्क कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST2017-08-23T22:55:17+5:302017-08-24T00:26:16+5:30
डिप्लोमाच्या राहिलेल्या विषयांची फी दुप्पट केल्याने ती कमी करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

डिप्लोमा इंजिनिअरिंग शुल्क कमी करण्याची मागणी
नाशिकरोड : डिप्लोमाच्या राहिलेल्या विषयांची फी दुप्पट केल्याने ती कमी करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस आमदार उमेश पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिप्लोमाच्या राहिलेल्या विषयांची एक सेमीचे फी ३६० रुपये इतकी होती. परंतु यावर्षी तिच्यामध्ये वाढ करून ६०० रुपये करण्यात आली आहे. सदर वाढीव फी कमी करून पूर्वीप्रमाणे स्थिर ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आमदार उमेश पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, एमएसबीईटीचे सचिव अभय
वाघ यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. निवेदनावर युवा मोर्चा चिटणीस सचिन हांडगे, शहर चिटणीस जयंत नारद, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, शंकर साडे, गौरव बाफणा, ऋषिकेश नारद, तेजस धाडीवाल, प्रणव मंडलेचा, गौरव विसपुते, शुभम राजगुरू, माज सय्यद, संतोष कसबे, इमरान शेख, अर्जुन क्षीरसागर आदिंच्या सह्या आहेत.