शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:10 IST

गावित यांचा दौरा : पावसाअभावी पिकस्थिती गंभीर

ठळक मुद्देतालुक्यात पावसाळा संपला तरी सरासरीच्या केवळ ५० टक्केपेक्षा कमी प्रमाण असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे

पाळे खुर्द : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यामध्ये कळवण या आदिवासी तालुक्याचा शासनाने समावेश न केल्याने कळवण तालुक्यातील जनतेत व आदिवासी बाधवामध्ये नाराजी असून पाऊस उशिरा झाल्याने पिक येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कळवणचा समावेश करावा, अशी मागणी आमदार जे.पी. गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आमदार जे. पी. गावित यांनी कळवण तालुक्यातील विविध गावांतील जाऊन पिकाची पाहणी केली. यावेळी पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तालुक्यात पावसाळा संपला तरी सरासरीच्या केवळ ५० टक्केपेक्षा कमी प्रमाण असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी बंधारे कोरडे असून पावसाच्या भरवशावर केलेला हंगाम वाया गेला आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांनी पिके जागविण्याचे आटोकाट प्रयत्न केला मात्र परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने पिके करपून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. भांडवल खर्च वाया गेला आहे. जनावरे आणि माणसांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील शेतजमिनी धोक्यात आल्या असून शेतकºयांना या संकटातून सावरता यावे तसेच कळवण महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून आणेवारी करावी, कळवण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आमदार जे. पी. गावित यांनी दुष्काळी पाहणी दरम्यान सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड, माकप सेक्रेटरी हेमंत पाटील, टिनू पगार, मोहन जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, नाना देवरे, अजय पगार आदी शेतकरी आदी उपस्थित होते, 

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ