इगतपुरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 04:07 PM2020-08-08T16:07:09+5:302020-08-08T16:08:38+5:30

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच दढी मारली असून गेल्या वीस ते पंचवीच ...

Demand for declaration of drought in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करऱ्याची मागणी

इगतपुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करु न नुकसान भरपाई मिळावी यासंबंधीचे निवेदन तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना देतांना लालचंद पाटील, अनिल गोवर्धने, चेतन जोशी, शुभम जाधव आदी.

Next
ठळक मुद्देभाजयुमा, शिवसंग्रामच्या वतीने तहसिलदारांना निवेदन सादर

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच दढी मारली असून गेल्या वीस ते पंचवीच दिवसांपासून पावसाने उघडीप केल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून मुख्य पिक असलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी इगतपुरी तालुका भारतीय जनता युवा मोर्चा व शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसिलदारांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी इगतपुरी तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे येथील शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मुख्य पिक असलेल्या भात पिक करपून गेल्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने भरपाई देण्यात यावी या संदर्भात भाजयुमोचे तालुकाध्यक्ष लालचंद पाटील तसेच शिवसंग्रामचे अनिल गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या उपस्थितीत इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष चेतन जोशी, उपतालुका युवा मोर्चा भरत सहाने, चिटणीस युवा मोर्चा मारु ती पाटील, निरंजन जाधव, शुभम जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Demand for declaration of drought in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.