सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.सध्या आठ दिवस रात्रीची शेतपंपासाठी वीज दिली जाते, तर आठ दिवस दिवसा दिली जाते; परंतु दिवसा आठ दिवस शेतीपंपासाठी देणाऱ्या विजेचा खेळखंडोबाच, होतो. कारण दहा ते पंधरा मिनिटाला वीज जात असते.रात्रीच्या वेळेला पिकांना पाणी द्यायचे म्हटले तर अनेक शेतकऱ्यांच्या घरी पुरुष माणूस नसतो, तर बरेच ठिकाणी रात्रीच्या वेळेला मोटार चालू करायला गेले असता तेथे शॉक लागून मृत्यूच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. काही ठिकाणी पहाटेच्यावेळी अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यायला हवी. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका आहे.अनेक ठिकाणी रोहित्राच्या क्षमतेपेक्षा जादा दाब रोहित्रावर असतो. त्यामुळे अनेक वेळा फ्यूज जाणे, डीओ जाणे असे प्रकार घडतात. फ्यूज किंवा डीओ बसवत असताना यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना विजेचा धक्का बसलेला आहे? बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे? ? त्यामुळे महावितरणने शेती पंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे?सध्या आठ दिवस दिवसा शेतीपांपासाठी वीज दिली जाते, तर आठ दिवस रात्रीची असते. रात्रीच्या वेळेसच विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याचे प्रमाण जास्त आहे. दिवसा वीजचे घोटाळे आणि रात्री वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा.- संदीप टर्ले, माजी सरपंच, चांदोरी.
शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:10 IST
सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.
शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी
ठळक मुद्देरात्री वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा.