देवी मंदिर रस्त्याचे खड्डे बुजविण्याची मागणी

By Admin | Updated: September 27, 2016 23:07 IST2016-09-27T23:07:18+5:302016-09-27T23:07:49+5:30

देवी मंदिर रस्त्याचे खड्डे बुजविण्याची मागणी

Demand for the construction of goddess temple road potholes | देवी मंदिर रस्त्याचे खड्डे बुजविण्याची मागणी

देवी मंदिर रस्त्याचे खड्डे बुजविण्याची मागणी

सिन्नर : गावाबाहेरील देवी मंदिर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, ते डांबराने बुजविण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शनिवारपासून घटस्थापना होत आहे. नवरात्रोत्सवात गावाबाहेरील देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. पहाटे व सायंकाळी महिला व भाविक दर्शनासाठी पायी येत असतात.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने भाविकांना चालणे अवघड होणार आहे. (वार्ताहर)
भाविकांची गैरसोय लक्षात घेवून नवरात्रौत्सव सुरु होण्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे डांबराच्या सहाय्याने बुजविण्याची मागणी उगले यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Demand for the construction of goddess temple road potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.