तातडीने नुकसानभरपाईची कॉग्रेसची मागणी
By Admin | Updated: March 16, 2015 00:43 IST2015-03-16T00:43:07+5:302015-03-16T00:43:18+5:30
तातडीने नुकसानभरपाईची कॉग्रेसची मागणी

तातडीने नुकसानभरपाईची कॉग्रेसची मागणी
निफाड : निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसनाभरपाई संदर्भात शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्षातर्फे तिव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिला आहे.
गेल्या ६ महिन्यात दोन ते तीन वेळेस गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शनीवारच्या गारपीटीने द्राक्षबागायदार, ऊस, गहू, कांदा उत्पादकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभारपाई मिळावी, या शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ करावे, त्यांचा ७/१२ कोरा करावा. कृषी पंपाचे वीजबिल माफ करावे. या संदर्भात युती शासनाने या शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसल्यास काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा पानगव्हाणे यांनी दिला आहे. दरम्यान निफाडचे आमदार अनिल कदम तसेच माजी आमदार दिलीप बनकर यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा करुन नुकसानग्रस्त द्राक्षबागा व इतर शेतमालाची पाहणी केली (वार्ताहर)