अपंग कामगारांना भरपाई देण्याची मागणी
By Admin | Updated: October 6, 2015 22:53 IST2015-10-06T22:52:53+5:302015-10-06T22:53:44+5:30
अपंग कामगारांना भरपाई देण्याची मागणी

अपंग कामगारांना भरपाई देण्याची मागणी
सातपूर : कारखान्यात काम करीत असताना अपघातात अपंगत्व आल्यास सदर कामगारांना व्यवस्थापनाकडून भरपाई मिळवून द्यावी व त्यास कायम करण्यात यावे, अशी मागणी औद्योगिक आरोग्य व सुरक्षा सहसंचालकांना दिलेल्या निवेदनाद्वारे कामगार विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कारखान्यात मशीनवर काम करीत असताना कामगाराचा अपघात होतो. या अपघातात सदर कामगाराला तात्पुरते अथवा कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा कामगाराकडे संबंधित व्यवस्थापन दुर्लक्ष करते. समाजातही वाईट प्रकारची वागणूक मिळते. लग्नही होत नाही. अशावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालकांनी अपघातात अपंगत्व आलेल्या कामगारास नोकरीत कायम करावे व व्यवस्थापनाकडून आर्थिक नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी कामगार विकास मंचचे कैलास मोरे, प्रवीण पाटील, भिवाजी भावले, नंदू गायकवाड, प्रवीण मोरे, योगेश चव्हाण आदिंसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)