खंबाळे येथील पशुपालकांची भरपाई मिळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 05:32 PM2019-11-28T17:32:23+5:302019-11-28T17:33:45+5:30

सिन्नर : तालुक्यातील खंबाळे येथील बिरोबावाडी वस्तीवर अज्ञात रोगाने चारशेपेक्षा अधिक शेळ्या-मेंढ्या व कोकरे मृत्युमुखी पडल्याने सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले असून मेंढपाळांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या रोगाचे पशुसंवर्धन विभागाने निदान करावे तसेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या मेंढपाळांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी मेंढपाळांच्या वतीने करण्यात आली असून याबाबत तहसीलदार राहुल कोताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांना निवेदन देण्यात आले.

 Demand for compensation of cattlemen at Khambale | खंबाळे येथील पशुपालकांची भरपाई मिळण्याची मागणी

खंबाळे येथील पशुपालकांची भरपाई मिळण्याची मागणी

Next

पंधरा दिवसांपासून शेळ्या-मेंढ्यांची मरतूक सुरु आहे. पशुसंवर्धन विभागाला अद्यापही अज्ञात रोगाचे निदान करण्यात यश आलेले नाही. खंडू म्हाळू गोफणे खंडू सगाजी गोफणे, लक्ष्मण गोफणे, सोमनाथ बोºहाडे, मिननाथ गोफणे, संपत आव्हाड आदी मेंढपाळांनी तहसीलदार व जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली. संसर्गजन्य रोग असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी त्याला पूर्णत: प्रतिबंध घालण्यात यश आलेले नाही. परिणामी परिसरातील पशुधन या रोगाला बळी पडण्याची भीती मेंढपाळांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मृत शेळ्या-मेंढ्यांचे केवळ पंचनामे करण्यात आले. मात्र पुढे आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे उपाय अपुरे ठरत असल्याचा आरोप मेंढपाळांनी केला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, सहाय्यक आयुक्त डॉ. झोड, विजय कवडे, पंचायत समितीचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे, नांदूरशिंगोटे येथील पशुधन विकास अधिकारी पी. आर. शेळके, डॉ. धुमाळ, डॉ. ऋषी शेळके, डॉ. प्रविण उगले, खुळे आदींनी मंगळवार (दि. २६) खंबाळेच्या बिरोबावाडीवर भेट दिली.

Web Title:  Demand for compensation of cattlemen at Khambale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी