पांढरूणचे ताडी दुकान बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:12 IST2021-04-19T04:12:53+5:302021-04-19T04:12:53+5:30
निवेदनात म्हटले आहे की, पांढरूण येथे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय अनेक दिवसांपासून बोगस ताडीचे दुकान सुरू आहे. गावात कोरोनाचा संसर्ग ...

पांढरूणचे ताडी दुकान बंद करण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, पांढरूण येथे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय अनेक दिवसांपासून बोगस ताडीचे दुकान सुरू आहे. गावात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून ताडी दुकान सील केलेले असताना बनावट ताडी दुकान सुरू आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत ताडी दुकान चालू करू नये म्हणून ग्रामपंचायतीनेदेखील नोटीस देऊनही दुकान चालूच होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत असून विरोध केल्यास खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी देण्यात येते. वडनेर खाकुर्डी पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांनी दखल घेतल्याने त्याने पळ काढला होता. पोलिसांनी सरपंचांच्या समक्ष पंचनामा केला होता. हजारो लीटर ताडीही जप्त केली होती. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून ताडी दुकान कायमचे बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे.