अवैध धंदे बंद करण्याची मागणी
By Admin | Updated: September 2, 2016 22:31 IST2016-09-02T22:31:39+5:302016-09-02T22:31:50+5:30
अवैध धंदे बंद करण्याची मागणी

अवैध धंदे बंद करण्याची मागणी
लासलगाव : परिसरात सुरू असलेल्या हॉटेलमधील अवैध धंद्यांना आळा घालावा यासाठी वॉर्ड क्र. २ मध्ये असलेल्या सप्तशृंगीनगर, यशवंतनगर, होळकरनगर, सुमननगर येथील नागरिकांनी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना निवेदन दिले.
या नगरांच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये दररोज मटका, जुगार अशा अवैध धंद्यांचा बाजार सुरू आहे. तसेच हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला असून, याचा परिणाम येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. संध्याकाळी ५ नंतर मटकेदारांची पाऊले या हॉटेलकडे वळतात. यात नशेखोर, अश्लील शिवीगाळ करणारे, भांडणे करणारे पहाटेपर्यन्त दंगा करत असतात. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, या ठिकाणाहून ये-जा करणेही सामान्यांना मुश्कील झाले आहे. यावर पोलिसांनी लवकर कारवाई केली नाही तर हॉटेल बंद पाडण्यासाठी आंदोलन पुकारू, असा इशाराही येथील जनतेने दिला आहे. (वार्ताहर)