पळसे परिसरातील वीटभट्ट्या बंद करण्याची मागणी
By Admin | Updated: May 15, 2017 00:19 IST2017-05-15T00:19:46+5:302017-05-15T00:19:58+5:30
पळसे : पळसे कारखानारोडवरील वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेती व रहिवाशांच्या आरोग्याचेनुकसान होत आहे

पळसे परिसरातील वीटभट्ट्या बंद करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पळसे : पळसेकारखानारोडवरील वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेती व रहिवाशांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होत असून वीटभट्ट्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पळसे कारखानारोड, पारले कंपनी परिसरातील शेतजमीन ही पूर्वीपासून बागायती शेती आहे. मात्र याठिकाणी असलेल्या वीटभट्ट्यांमुळे शेती व्यवसायावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. शेती व्यवसाय अगोदरच विविध कारणांमुळे संकटात आहे. वीटभट्ट्या बंद करण्याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार, निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. याची गंभीर
दखल घेऊन शेतजमीन नापीक करणाऱ्या व रहिवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या वीटभट्ट्या बंद कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली
आहे. निवेदनावर गणपत गायधनी, भास्कर चौधरी, गोकुळ चौधरी, दगू खोले, विष्णु चौधरी, आशिष तुंगार, विलास शिंदे, सुभाष गायखे, शिवाजी शिंदे, दयाराम गायधनी, सुनील गायधनी आदिंसह परिसरातील शेतकरी व रहिवाशांच्या सह्या आहेत.