बंद पथदीप सुरू करण्याची मागणी

By Admin | Updated: October 9, 2015 22:47 IST2015-10-09T22:47:04+5:302015-10-09T22:47:31+5:30

बंद पथदीप सुरू करण्याची मागणी

Demand for closed street lights | बंद पथदीप सुरू करण्याची मागणी

बंद पथदीप सुरू करण्याची मागणी

पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्रमांक तीनमधील नागरी वसाहतीत गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, यासाठी नगरसेवक रूची कुंभारकर यांनी मनपा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी पाहणी दौरा केला.
प्रभागातील हिरावाडी परिसर, शक्तिनगर, कमलनगर, शिवकृपानगर, सिद्धेश्वरनगर, साईनगर, त्रिकोणी बंगला, धात्रकफाटा भागातील अनेक पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असून परिसरात भुरट्या चोऱ्यांची शक्यता वाढली आहे. प्रभागातील बंद पथदीपांबाबत नागरिकांनी कुंभारकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कुंभारकर यांनी बुधवारी मनपाच्या विद्युत विभागाचे अधिकारी श्याम दराडे यांच्यासमवेत बंद पथदीपांची पाहणी करून जे पथदीप बंद असतील ते तत्काळ सुरू करण्याबाबत मागणी केली. यावेळी नागरिकांनीही विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पथदीप वारंवार बंद राहत असल्याबाबत तक्रारी केल्या. (वार्ताहर)

Web Title: Demand for closed street lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.