नगरच्या डाळिंबाला नेपाळमध्ये मागणी
By Admin | Updated: July 21, 2016 22:59 IST2016-07-21T22:56:43+5:302016-07-21T22:59:09+5:30
नाशिक बाजार समितीत मागणी : दैनंदिन ७ टन निर्यात

नगरच्या डाळिंबाला नेपाळमध्ये मागणी
संदीप झिरवाळ पंचवटी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळबाजारात अहमदनगर, संगमनेर येथून विक्रीसाठी दाखल होणाऱ्या डाळिंबाला नेपाळमध्ये मागणी असल्याने नाशिकच्या फळबाजारातून नेपाळला दैनंदिन ७ ते ८ टन डाळिंब मालाची निर्यात केली जात आहे.
पेठरोडवरील बाजार समितीच्या फळबाजारात संगमनेर, अहमदनगर या भागांतून मोठ्या प्रमाणात डाळिंब मालाची आवक होत असते. सदरचा डाळिंब माल खरेदी केल्यानंतर व्यापारी तो माल संपूर्ण उत्तर भारतात पाठवितात. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून नगरच्या डाळिंबाला नेपाळमध्ये मागणी होऊ लागल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दाखल झालेला डाळिंब नेपाळमध्ये निर्यात केला जात आहे.
बाजार समितीतून सध्या दैनंदिन ७ तेजीत ८ टन डाळिंब नेपाळमध्ये पाठविला जातो. नाशिक बाजार समितीच्या फळबाजारात दैनंदिन ४५ ते ५० टन डाळिंब मालाची आवक होत असते.