महादेव कोळींना जातीचे दाखले देण्याची मागणी
By Admin | Updated: January 24, 2016 22:30 IST2016-01-24T22:27:45+5:302016-01-24T22:30:02+5:30
महादेव कोळींना जातीचे दाखले देण्याची मागणी

महादेव कोळींना जातीचे दाखले देण्याची मागणी
मालेगाव : जिल्ह्यातील महादेव कोळींना पडताळणी करून त्वरित जातीचे दाखले देण्यात यावे, अशी मागणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे राज्य कोळी समाजाचे चेतन पाटील, शंकर निकम, सुरेश बच्छाव यांच्या शिष्टमंडळाने आदिंनी केली आहे.
कसमादेत १९५० पासून या समाजाचे लोक राहत असून, त्यातील काहींकडे दाखले आहेत. या दाखल्यांसाठी लागणारा १९४६ चा पुरावा
असताना अधिकारी दाखले व पडताळणी
करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिष्टमंडळात रतन
खैरनार, गणेश बच्छाव बापू निकम, प्रभाकर खैरनार, बाबुलाल खैरनार, अशोक काकुळते, अनिल निकम, सतिष धडे आदिंचा समावेश
आहे.