खतांवरील व्हॅट रद्द करण्याची मागणी
By Admin | Updated: March 10, 2016 23:17 IST2016-03-10T22:55:32+5:302016-03-10T23:17:47+5:30
खतांवरील व्हॅट रद्द करण्याची मागणी

खतांवरील व्हॅट रद्द करण्याची मागणी
येवला : शासनाने रासायनिक खतावरील व्हॅट कंपनी ते वितरक या स्तरावरच वसूल करावा. किरकोळ विक्रे ता ते शेतकरी या स्तरावरील व्हॅट आकारणी त्वरित रद्द करावी, अशी मागणी सहकार नेते अंबादास बनकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
देशात आठ ते दहा रासायनिक खतांच्या प्रमुख कंपन्या आहेत. या कंपन्या संपूर्ण देशाला रासायनिक खतांचा पुरवठा करतात. खते पुरवठा करताना कंपन्या वितरकांना, वितरक किरकोळ विक्रेत्यांना व विक्रेते शेतकऱ्यांकडून व्हॅटची रक्कम वसूल करतात. ही रक्कम किरकोळ स्वरूपाची असली तरी अनेक विक्रेत्यांची व्हॅट संबंधातील प्रकरणे विक्रीकर खात्याकडे प्रलंबित असतात. शासनाला ही व्हॅटची रक्कम काही प्रमाणात मिळते, तर काही रक्कम सोडून द्यावी लागते व शेतकऱ्यांचाही शासनाच्या व्हॅट वसुली धोरणामुळे रोष ओढवून घ्यावा लागतो. सर्व खत विक्र ी शासन नियंत्रित आहे. रासायनिक खतांच्या किमती शासनाला माहिती आहे. त्यामुळे शासनाने कंपनी वितरकांना रासायनिक खते दिल्याबरोबर शेतकरी स्तरापर्यंतचा व्हॅट वसूल करावा, अशी मागणी बनकर यांनी पत्राद्वारे केली आहे.