वीज खासगीकरणाचा ठेका रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:17 IST2020-01-22T22:48:12+5:302020-01-23T00:17:56+5:30
वीज खासगीकरणाचा ठेका रद्द करावा, अशी मागणी माजी आमदार आसीफ शेख यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव शहरात वीज वितरणाचा ठेका खासगी कंपनीला देण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देताना काँग्रेसचे माजी आमदार आसीफ शेख.
मालेगाव : शहरातील वीज खासगीकरणाचा ठेका रद्द करावा, अशी मागणी माजी आमदार आसीफ शेख यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव शहरात ७० टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखालील आहे. शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योग केला जातो. या उद्योगाला विजेची आवश्यकता आहे. वीज वितरण कंपनीने खासगी ठेकेदाराला ठेका दिला आहे. यामुळे ग्राहक व खासगी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. वीजबिल जादा आकारले जात आहे. शहरातील वीज वितरण व्यवस्था खासगी कंपनीकडे देऊ नये, अशी मागणी माजी आमदार शेख यांनी केली आहे.