नांदगावला निधी उपलब्धतेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:27+5:302021-09-24T04:17:27+5:30
नांदगाव : नांदगाव येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात मूलभूत सोयी-सुविधांचे मोठे नुकसान झाले असल्याने नदीचे खोलीकरण, संरक्षक भिंत व इतर ...

नांदगावला निधी उपलब्धतेची मागणी
नांदगाव : नांदगाव येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात मूलभूत सोयी-सुविधांचे मोठे नुकसान झाले असल्याने नदीचे खोलीकरण, संरक्षक भिंत व इतर अनेक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे.
येथील मोठे सार्वत्रिक नुकसान भरून मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे २ कोटींच्या निधीचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले आहे. नदीचे खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे आणि विवेक हॉस्पिटल ते स्मशानभूमी रस्त्यावरील वाहून गेलेला पूल बांधणे यासाठी नगर परिषद व इतर ठिकाणच्या कामांसाठी किमान १० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कांदे यांनी दिले. मंत्रिमहोदयांनी मागणीला प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मकता दर्शविल्याचे कांदे यांनी सांगितले.
फोटो - २३ सुहास कांदे
नांदगावच्या पूरग्रस्तांबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन चर्चा करताना आमदार सुहास कांदे.
230921\23nsk_49_23092021_13.jpg
फोटो - २३ सुहास कांदे