शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

वाढीव रेडीरेकनरमुळे ५० टक्क्यांनी व्यवहार घटले क्रेडाई : २०१३ चे दर लागू करण्याची मागणी

By admin | Updated: May 23, 2014 00:56 IST

नाशिक : शासनाने २०१३ च्या मुद्रांक शुल्कात (रेडीरेकनर) ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ केल्याने राज्यातील इतर भागांच्या तुलनेत नाशिकमधील बांधकाम क्षेत्रावर चांगलाच परिणाम झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी व्यवहार घटल्याची माहिती महाराष्ट्र के्रडाईचे अध्यक्ष अनंत राजेगावकर व नाशिक शाखेचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : शासनाने २०१३ च्या मुद्रांक शुल्कात (रेडीरेकनर) ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ केल्याने राज्यातील इतर भागांच्या तुलनेत नाशिकमधील बांधकाम क्षेत्रावर चांगलाच परिणाम झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी व्यवहार घटल्याची माहिती महाराष्ट्र के्रडाईचे अध्यक्ष अनंत राजेगावकर व नाशिक शाखेचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजेगावकर यांनी सत्ताधार्‍यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त करीत रेडीरेकनरच्या रूपात बांधकाम व्यावसायिकांवर एकप्रकारे जिजीया कर लादला असल्याचे सांगितले. बांधकाम क्षेत्राकडे शासन केवळ उत्पन्नाचे स्रोत म्हणून बघत असल्याने ग्राहकांना स्वप्नातील घर खरेदी करणे अशक्य होत आहे. वाढीव रेडीरेकनरचा फटका बांधकाम व्यावसायिकांना नव्हे, तर ग्राहकांना सर्वाधिक बसत असल्याने शासनाने याबाबत सकारात्मक धोरण अवलंबिणे गरजेचे असल्याचे राजेगावकर म्हणाले. जयेश ठक्कर यांनी, वाढलेल्या रेडीरेकनरमुळे ग्राहकांना १२ ते १५ टक्के अधिक रक्कम भरावी लागत असून, नसलेल्या व्यवहारासाठी ३० टक्के रक्कम विविध करांच्या माध्यमातून भरावी लागत आहे. कारण २८०० रुपयांनी विकलेल्या फ्लॅटचे ॲग्रीमेंट ३३०० रुपये दराने करावे लागत असल्याने १२ टक्के म्हणजेच ६० हजार रुपये ग्राहकांना भुर्दंड बसतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून खासगी दरांच्या तुलनेतच रेडीरेकनरचा दर प्रतिवर्षी वाढविण्याची प्रक्रि या नियमित ठेवल्याने वास्तवातील बाजार दर आणि शासकीय दर यांतील तफावत वाढली आहे. त्यामुळे शासनाने २०१३ चे दर लागू करून ग्राहकांना दिलासा द्यावा, तसेच बांधकाम क्षेत्राची होत असलेली अधोगती थांबवावी, असेही ठक्कर यांनी सांगितले. यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष राजू ठक्कर, सचिव नरेश कारडा, अमित रोहमारे, सुनील गवांदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)