आर्टिलरीरोड चौकात गतिरोधकाची मागणी
By Admin | Updated: December 15, 2015 00:18 IST2015-12-15T00:15:58+5:302015-12-15T00:18:15+5:30
आर्टिलरीरोड चौकात गतिरोधकाची मागणी

आर्टिलरीरोड चौकात गतिरोधकाची मागणी
नाशिकरोड : आर्टिलरी सेंटररोड सुराणा हॉस्पिटल चौकात वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
वाहतूक शाखा कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्टिलरी सेंटररोड सुराणा हॉस्पिटल चौकात वाढत्या रहदारीमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. महिन्याभरापूर्वीच झालेल्या अपघातात एका वाहनचालकाचा मृत्यू झाला.
निवेदनावर माजी नगरसेवक भय्या मणियार, शेख नईम मजिद, करण सोळसे, जयंत गाडेकर, प्रशांत साबद्रा, चंद्रकला छाजेड, दिलीप निसाळ, नारायण गोसावी, गौरव गाडेकर आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)