अपात्र संचालकांवर कारवाईची मागणी
By Admin | Updated: October 22, 2016 01:43 IST2016-10-22T01:42:22+5:302016-10-22T01:43:27+5:30
अपात्र संचालकांवर कारवाईची मागणी

अपात्र संचालकांवर कारवाईची मागणी
नाशिक : जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या अपात्र संचालकांवर कारवाई करून सोसायटी बरखास्त करण्याची मागणी नााशिक जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे शुक्रवारी करण्यात आली. संघटनेतर्फे सोसायटी बरखास्तीच्या मागणीसाठी शुक्रवारी विभागीय निबंधक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करून मागण्यांचे निवेदन दिले.
संघटनेने आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी अनेक निवेदने देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने संघटनेला निदर्शने करण्याची वेळ आल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले. तसेच सोसायटीच्या अपात्र संचालकांवर कारवाई करून सोसायटी बरखास्त करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. तसेच सोसायटी बाहेरील व्यक्तींचा सोसायटीतील हस्तक्षेप थांबविण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी एनडीएसटी सोसायटीच्या समन्वय समिती एकता मंचचे प्रकाश सोनवणे, एस. बी. शिरसाठ, साहेबराव कुटे, डी. यू. अहिरे, जी. पी. कुशारे, माणिक मटवई, संजय पाटील, संग्राम करंजकर, वासुदेव भदाणे, किशोर जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)