एटीएम कार्डचे वितरण
By Admin | Updated: February 10, 2017 00:06 IST2017-02-10T00:06:33+5:302017-02-10T00:06:44+5:30
नांदूरशिंगोटे : टपाल कार्यालयात कार्यक्रम

एटीएम कार्डचे वितरण
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील टपाल कार्यालयात गुरुवारी खातेधारकांना एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले.
केंद्र शासनाने १ जानेवारी २०१७ पासून पोस्टल नेटवर्क बॅँक नेटवर्कला जोडले आहे. त्यामुळे पोस्टातील खातेधारकांना बॅँकांतील खात्याप्रमाणे एटीएममधून पैसे काढता येणार आहे. सध्या देशभरात पोस्टाचे ९६९ एटीएम केंद्र कार्यान्वित झाले आहेत. टपाल विभागाकडून ग्राहकांना रूपे डेबिट कार्ड या प्रकारातील एटीएम कार्ड वितरित करण्यात आले आहे.
पोस्टमास्तर नरेंद्र सपकाळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त टपाल कर्मचारी बी. टी. सानप यांना कार्ड देऊन एटीएम कार्ड वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अमोल गवांदे, शाखा डाकपाल मदन परदेशी, दामोधर नन्नावरे, शरद गोराणे, विजय तांबे, लहानु जगताप, विशाल लांडगे, सोमनाथ उगले, बाळासाहेब दराडे, विलास गवारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
दुचाकीची चोरी
नाशिक : पंचवटीतील दिवटे वाड्यातील रहिवासी जयवंत नागराणी यांची २० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच ४१, एच ५४६२) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)