युवकांकडून काळविटांना जीवदान
By Admin | Updated: March 3, 2017 00:43 IST2017-03-03T00:42:57+5:302017-03-03T00:43:14+5:30
ममदापूर : येथे रात्रीच्या वेळी दोन काळविटांत झुंज झाली असताना ते विहिरीत पडले. येथील तरुणांनी विहिरीत उतरून दोन्ही काळविटांना अलगद बाहेर काढले.

युवकांकडून काळविटांना जीवदान
ममदापूर : विहिरीत उतरून अलगद काढले बाहेरममदापूर : येथे रात्रीच्या वेळी दोन काळविटांत झुंज झाली असताना ते विहिरीत पडले. मंगळवारी (दि. २८) सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर येथील तरुणांनी विहिरीत उतरून दोन्ही काळविटांना अलगद बाहेर काढले.
संतोष बनसोडे, अशोक बनसोडे हे विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढण्यासाठी गेले असता विहिरीतून आवाज आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर दोन काळवीट पडलेले दिसले. सद्या परिसरात विहिरींनी तळ गाठला असल्याने ती बचावले. बनसोडे यांच्या विहिरीत दोन फुटांपर्यंत पाणी होते. काळवीट जिवंत असल्याचे पाहून बनसोडे यांनी वनपाल अशोक काळे यांना दूरध्वनीद्वारे कळविले. काळवीट हे साधारण तीन वर्षे वयाचे असून, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. त्यामुळे जंगलात सोडून देण्यात आले. यासाठी वनपाल अशोक काळे, वनरक्षक जे. के. शिरसाठ, पी.बी. वाघ, मनोहर दाणे, तुषार गिडगे, प्रमोद केरे, विजय बनसोडे, गोरख बनसोडे, डॉ. राऊत यांनी काळवीट बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यामुळे दोन काळवीटांना जीवदान मिळाले. (वार्ताहर)