आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोजवारा

By Admin | Updated: July 16, 2016 00:03 IST2016-07-15T23:58:07+5:302016-07-16T00:03:08+5:30

इगतपुरी : महसूल आणि पोलीस प्रशासनाची उदासीन

Deletion of emergency management | आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोजवारा

आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोजवारा

ताघोटी : आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यावर मात करण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते. मात्र इगतपुरी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यात आपत्कालीन व्यवस्थापनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी आणि या स्थितीत जीवन-मृत्यूच्या संकटात सापडलेल्यांना वाचविण्यासाठी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापन नामधारी ठरले आहे. आपत्कालीन व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य आण यंत्रणाच तालुक्यात उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती निवारण केंद्र असणे आवश्यक असताना इगतपुरीतील हे केंद्र गेली अनेक वर्षापासून गायब असल्याचे दिसते.तर तालुक्यात कोणी पाण्यात बुडाल्याची घटना घडली तर जीवरक्षक जवान उपलब्ध होत नसल्याने पोहणा-याचा शोध घ्यावा लागतो.तर कुठे आगीची घटना घडली तर सक्षम अशी अिग्नशामक यंत्रणा नसल्याने मिहंद्रा सारख्या आठवा इगतपुरी नगरपालिका किंवा टोल नाक्यावरील बंबाच्या भरवशावर राहावे लागते.शासनाने या बाबी लक्षात घेवून आपत्कालीन यंत्रणा गतिशील करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Deletion of emergency management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.